रोहयोची कामे अधिक गतीने करावी- संदीपान भुमरे

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २ डिसेंबर २०२२ I राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत ग्रामसेवकांचीभूमिका महत्त्वाची आहे. या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची गती वाढवावी, असे निर्देश रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी दिले.रोहयो मंत्री श्री. भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी ग्रामसेवक संघटनेच्या निवेदनाच्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. आमदार संजय बनसोड, रोहयोचे अपर मुख्य सचिव नंदकुमार, फलोत्पादन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. के. पी. मोते, परिमल सिंह यांच्यासह रोहयो आणि फलोत्पादन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम