स्वाभिमानी शेतकरी संघटने १७ व १८ नोव्हेंबर रोजी ऊसतोड बंद आंदोलन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | दोन टप्प्यातील एफआरपीऐवजीएक रकमी एफआरपीचा कायदा हिवाळी अधिवेशनात संमत करावा, यासह एफआरपीचे सूत्र बदलून एफआरपीत वाढ करावी या प्रमुख मागण्यासह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यात १७ आणि १८ नोव्हेंबरला सलग दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलन करणार येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.या मागण्यासह साखरेची किमान विक्री किंमत 31 वरून 35 रुपये करावी, सर्व प्रकारच्या इथेनॉल मध्ये प्रतिलिटर पाच रुपयांची वाढ करावी. इथेनॉल विक्रीमध्ये शेतकऱ्याला 70 टक्के हिस्सा मिळावा, खुल्या साखर निर्यात धोरण अंतर्गत साखर निर्यातीला परवानगी द्यावी आदी प्रमुख मागण्यांकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम