देशातील कापूस बाजार स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १० डिसेंबर २०२२ I देशातील बाजारात आज कापसाचे दर स्थिर होते. त्यातच बाजारातील आवकही कमीच आहे.

आज देशातील कापसाला सरासरी ८ हजार ५५० ते ८ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. कापसाचे दर कमी होत नसल्यामुळे उद्योगाने सरकारकडे निर्यातशुल्क रद्द करण्याची मागणी केली. मात्र सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यता कमीच आहे. तसेच भारताने आयातशुल्क कमी केल्यास निर्यातदार देश दर वाढवतात. त्यामुळे कापूस दरावर फारसा परिणाम होणार नाही, अशी माहिती कापूस बाजारातील जाणकारांनी दिली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम