टोमॅटोला रुपया दर मिळाल्याने शेतकऱ्याने उभे पीक उपटून फेकले

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २ जानेवारी २०२३ । मोठ्या प्रमाणात खर्च करून देखील येवला तालुक्यातील शेतकरी वर्गाने टोमॅटोची उत्पादन घेतले मात्र टोमॅटोला एक ते दीड रुपये प्रति किलो दर मिळत असल्याने अक्षरशा उभे पीक उपटून टाकत शेतात जनावरे सोडून देण्याची वेळ पाटोदा गावच्या दीपक कव्हात या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.

येवला तालुक्यातील पाटोदा गावातील दीपक कव्हात या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी तीन टप्प्यांमध्ये पाच एकर क्षेत्रामध्ये टोमॅटोचे लागवड केली. मात्र सतत पडणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी वर्गानि दिवसाकाठी सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा तीन वेळेस महागड्या औषधांची फवारणी करून पीक वाचवले.

 

मात्र गेल्या दीड दोन महिन्यांपासून दररोज टोमॅटोचे बाजारभाव कोसळत आहे.टोमॅटोला एक ते दीड रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने यातून उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही. अक्षरशा हताश होत उभे टोमॅटोचे पीक उपटून फेकत जनावरे शेतात चरण्यासाठी सोडून देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम