देशात ३२० लाख टन मका उत्पादन होण्याचा अंदाज

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १ जानेवारी २०२३ । यंदा खरिपातील मका उत्पादनात घट झाली आहे. तर निर्यातही मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळं देशात मक्याची उपलब्धता कमी होती. परिणामी सध्या मक्याचे दर टिकून आहेत. यंदा देशात ३२० लाख टन मका उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

 

paid add

मात्र खरिपातील घटलेले उत्पादन आणि रब्बीतील वातावरण बघत उत्पादन ३२० लाख टनांपेक्षाही कमीच राहील, असा अंदाज शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करत आहेत. यंदा मका उत्पादन घटण्याचा अंदाज असला तरी वापर मात्र वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यंदा मक्याचा वापर २ लाख टनांनी वाढून ३०१ लाख टनांवर पोचेल, असा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम