कृषी सेवक I ४ डिसेंबर २०२२ I शेतीला जोडधंदा म्हणून बरेचसे व्यवसाय आहेत. त्यामधील एक व्यवसाय शेतकरी मोठ्या प्रमाणात करतात तो म्हणजे दुग्धव्यवसाय. शेतीत असणारा चारा पशुपालन करण्यास फायद्याचा ठरतो. तसेच दुधाच्या पैशातून शेतकऱ्यांना मदत देखील होते.
या व्यवसायामुळे शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह देखील होतो. यामुळे शेतकरी पशुपालन व्यवसाय करण्यासाठी भर देत आहे. तसेच दुग्धव्यवसाय करण्यासाठी सरकार देखील नवनवीन योजना राबवित आहे.
आता नवीन योजना सरकारने सुरू केली आहे. या योजनेचे नाव ‘दुग्धउद्योजकता विकास योजना’ असे आहे. या योजनेतंर्गत दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना नाबार्डमार्फत 33 टक्के अनुदान मिळते.
योजनेची उद्दिष्टे
सरकारच्या या योजनेमुळे दुग्धव्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लॉटरी सुरू झाली आहे. यामुळे दूध उत्पादनांत वाढ होईलच त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न देखील वाढ होईल.
याशिवाय, व्यावसायिक स्तरावर दूध हाताळण्यासाठी नवीन तंत्र उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगार निर्माण करणे आणि असंघटित क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे. असे या योजनेची उद्दिष्टे आहेत.
योजनेसाठी कोण अर्ज करू शकतात?
शेतकरी
वैयक्तिक उद्योजक
स्वयंसेवी संस्था
कंपन्या
संघटित क्षेत्रातील गटांमधील स्वंय-सहाय्यता गट
दुग्ध सहकारी संस्था
दूध संघ
हे योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराला या योजनेतंर्गत उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा दिल्या जातील. कुटूंबातील एकापेक्षा जास्त सदस्य या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
या अटीनुसार ते वेगवेगळ्या पायाभूत सुविधांसह वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र डेअरी युनिट्स स्थापन करत आहेत. या दोन शेतांच्या सीमा मध्ये किमान 500 मीटर अंतर असावे.
या योजनेतंर्गत सर्वसाधारण श्रेणीसाठी डेअरी युनिटच्या खर्चाच्या 25 टक्के आणि SC/ST शेतकऱ्यांसाठी नाबार्डकडून 33 टक्के अनुदान दिल्या जाईल. तसेच सरकार डेअरी फार्म उभारण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या 10 टक्के रक्कम कर्ज म्हणून देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना व तसेच इतर लाभार्थ्यांना दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. (Dairy Farm Subsidy in Maharashtra)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकता. ही योजना दुग्धव्यवसाय सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी व इतरांसाठी फायदेशीर आहे. या योजनेची माहिती दुग्धव्यवसाय सुरू करणाऱ्यांना माहिती असणं गरजेचं आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम