राज्यातील ‘या’ जिल्ह्यात सर्वात कमी झाला पाऊस !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १३ ऑगस्ट २०२३ | गेल्या दोन महिन्यापासून देशातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. पण राज्यातील काही भागात पाऊस नसल्याने अनेक शेतकरी हैराण झाले आहे. दरवर्षी जून ते सप्टेंबर या या दरम्यान वाशिम जिल्ह्यात एकूण 789 मिमी पाऊस पडतो. त्यातील प्रत्यक्षात 493 मिमी पावसाची नोंद ऑगस्ट महिन्यात होते. यंदा आतापर्यंत 448 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

मंगरूळपीर, मानोरा आणि कारंजा या तीनच तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण सर्वाधिक असून वाशिम, मालेगाव आणि रिसोड या तीन तालुक्यांमध्ये या वर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. परिणामी, संबंधित तालुक्यांमधील सिंचन प्रकल्पांची पातळी अद्याप वाढलेली नाही. ही स्थिती अशीच कायम राहिल्यास आगामी रब्बी हंगामात तीन तालुक्यांमध्ये सिंचनाचा मोठा प्रश्न उद्भवणार असल्याची दाट शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

वाशीम जिल्ह्यातील पांगरी नवघरे गावासह परिसरात सोयाबीन पिकावर पिवळा मोझ्याक या विषाणुजन्य रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. अचानक उद्भवलेल्या या अस्मानी संकटाने शेतातील उभे पीक नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पश्चिम विदर्भात प्रामुख्याने सोयाबीन पीक घेण्यात येते याचं पिकावर पिवळा मोझ्याक या विषाणुजन्य रोगाने अचानक हल्ला चढविला आहे. त्यामुळं हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या जातो का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने शेतातील पिकाची पाहणी करुन शेतकऱ्याचं मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून धुळे जिल्ह्यात पाऊस नाही. नेहमी ढगाळ वातावरण राहत असल्याने त्याचा परिणाम कपाशीवर होऊ लागला आहे. कपाशीची वाढ खुंटली असून शेतकऱ्याला वारंवार कीटकनाशकाची फवारणी करावी लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोग पडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ही फवारणी करावी लागत आहे. सध्या फुलांबरोबर कपाशीची बोंड देखील यायला लागली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम