उस्मानाबादमध्ये पिकविम्यासाठी शेतकरी आक्रमक ; बस फोडल्या

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ | येथील आंदोलक शेतकरी पीक विम्यासाठी आक्रमक झाले असून, अज्ञातांनी एसटी बस फोडल्या आहेत. उस्मानाबाद शहरातील तेरणा कॉलेजसमोर आंदोलकांनी टायर जाळल्याचा प्रकारही समोर आला असून, याचा परिणाम उस्मानाबाद बस डेपोच्या वाहतुकीवर झाला आहे.

ठाकरे गटाकडून उस्मानाबाद बंदची हाक देण्यात आली होती. आमदार कैलास पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. शेतकऱ्यांसाठी सुरु केलेलं कैलास पाटील यांच्या आंदोलनाचे तीव्र पडसाद आता उस्मानाबादमध्ये उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर उस्मानाबादमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे.

शहरातील डेपोतील वाहतूक संथ गतीने सुरु आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पोलिस बंदोबस्तही वाढण्यात आला आहे. अनेक शेतकरी हे कैलास पाटील यांच्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आले आहेत. या सगळ्यामुळे आता उस्मानाबादेतली पीक विम्याचं आंदोलन आता चिघळत असल्याचं दिसत आहे.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम