अतिवृष्टीने बुलढाणा जिल्ह्यात १ लाख हेक्टरचे नुकसान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २९ ऑक्टोबर २०२२ |बुलडाणा जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टीने थैमान घातले असल्याने हंगाम अखेर हे नुकसान तब्बल एक लाख ४ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले असून या हंगामात वीज पडून १३ जणांचे बळी गेले आणि सुमारे ७५ जनावरे दगावली आहेत.

paid add

गेल्या तीन वर्षांपासून बदललेल्या निसर्गाचा शेतकऱ्यांना सातत्याने फटका बसलेला आहे. यंदाच्या खरीप हंगामातही याची पुनरावृत्ती झाली. सातत्याने झालेल्या सुरुवातीच्या काळातील पावसाने तसेच परतीच्या पावसाने तब्बल एक लाख चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले. यात सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे.अतिवृष्टी, पूर, वादळामुळे २०३ कुटुंबाच्या घरांचे नुकसान झाले तर ७५ गुरे दगावली. जिल्ह्यात यंदाच्या हंगामात वार्षिक सरासरीच्या ११४ टक्के पाऊस नोंद झालेला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम