येत्या तीन दिवसात असे असेल तापमान ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । १६ फेब्रुवारी २०२३।  राज्यात आता थंडीची लाट कमी झाली आहे. तर काही भागात उन्हाचा चटका बसू लागला आहे. यावर बळीराजाची शेतीसाठी कसे तापमान असेल, याचा प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर तीन दिवस किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसात कमल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे

आज जळगाव येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची पाहायला मिळाले. जळगाव जिल्ह्यात ८ डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर मुंबई येथे राज्यातील सर्वाधिक १८.२ डिग्री सेल्सिअस एवढे तापमान नोंदवण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवसांत राज्यात सर्व भागात तापमानात वाढ पाहायला मिळेल असा अंदाज हवामान विभागले दिला आहे.

 

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडा विभागामध्ये पुढील 24 तासात किमान तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही त्यानंतर तीन दिवस किमान तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 3 ते 4 दिवसात कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे
मराठवाडयात दिनांक 17 ते 23 फेब्रूवारी 2023 दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम