कृषी सेवक | ६ नोव्हेंबर २०२२ | सध्या उसाचा हंगाम सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांची ऊसतोड सुरू आहे. असे असताना वीजवाहक तारांच्या घर्षणाने लागलेल्या आगीत वाणेवाडी (ता. बारामती) येथील साडेतीन एकर ऊस जळाला आहे.
यामुळे यामध्ये शेतकर्यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकरी बाळकृष्ण भोसले, अक्षय भोसले, विलास भोसले, बेबी बापूराव जगताप, सुरेखा रामदास संकपाळ या सर्व सभासदांचा मिळून 3.5 एकर ऊस आगीत जळाला आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले.
सोमेश्वरचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान, वीजवाहक तारांना झोळ पडले आहेत तर काही ठिकाणी तारा थेट हातालाच येत आहेत
यामुळे धोका निर्माण झाला आहे, यामुळे मोठे नुकसान टाळण्यासाठी महावितरणने प्रयत्न करणे गरजेचे आहे. उसाच्या पिकातून शेतकर्यांना ठोस उत्पन्न मिळते. अवकाळी पावसामुळे ऊस सोडून सर्व पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम