टोमॅटोचे दर घसरले ; ३० रुपये प्रति किलो होतेय विक्री

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ९ नोव्हेंबर २०२२ | राज्यात विविध ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणावर टोमॅटो पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे  टोमॅटो ४० रुपये किलो, तर किरकोळ बाजारात ५० ते ५५ रुपये किलोपर्यंत दरवाढ झाली होती. मात्र, दिवाळीनंतर हे दर किलोमागे २५ रुपयांनी घसरले असून किरकोळ बाजारात ३० रुपये किलोने टोमॅटोची विक्री होत आहे. अतिवृष्टीमुळे टोमॅटो नाशिक, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी टोमॅटोची केलेली लागवड पाण्याखाली गेली होती. हाती आलेले पीक डोळ्यांदेखत सडू लागले होते. यामुळे मुंबई एपीएमसीला होणारी टोमॅटोची आवक कमी झाली होती. त्यामुळे टोमॅटोचे दर वाढले होते.

घाऊक बाजारात नेहमी ७० ते ८० गाड्या टोमॅटोची आवक होत होती. ती आवक ३० ते ३५ गाड्यांवर आली होती. यामुळे एपीएमसी घाऊक बाजारात ३५ ते ४० रुपये, तर किरकोळ बाजारात उत्तम प्रतीचा टोमॅटोला ६० ते ६५ आणि दुय्यम प्रतीचा टोमॅटो ५० ते ५५ रुपये ग्राहकांना मोजावे लागत होते.

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम