युक्रेनच्या शेतकऱ्यांचा कडधान्यांकडे कल

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २७ नोव्हेंबर २०२२ I रशियाबरोबर सुरू असलेल्या युध्दात होरपळणाऱ्या युक्रेनच्या शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांकडे कल वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनमध्ये खतांचा तुटवडा आहे. वाटाणा आणि इतर कडधान्य पिकांना खतांची गरज कमी भासते.

 

त्यामुळे पुढील हंगामात युक्रेनचे शेतकरी कडधान्य पिकांचा पेरा वाढवण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील कडधान्य उद्योग बहुतांश करून निर्यातकेंद्रीत आहे. रशिया-युक्रेन युध्दामुळे या उद्योगाला मोठा फटका बसलाय.

 

२०२१ च्या हंगामातील बहुतांश कडधान्य युध्द सुरू होण्यापूर्वीच निर्यात करण्यात आले आहे. युध्द सुरू झाल्यामुळे २०२२ मधील कडधान्य लागवडीवर मात्र प्रतिकूल परिणामा झाला. आधीच्या वर्षीच्या तुलनेत पेरा निम्म्याने घटला. आता पुढच्या हंगामात कडधान्य पेरा वाढण्याची शक्यता आहे. २०२२ पूर्वी युक्रेनमधल्या कडधान्यांची टर्की, पाकिस्तान, मलेशिया आणि युरोपियन युनियनला निर्यात होत असे. परंतु युध्द सुरू झाल्यानंतर मात्र बहुतांश माल थेट युरोपियन युनियनला गेला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम