कृषी सेवक I २७ नोव्हेंबर २०२२ I छिंदवाडा हे मध्य प्रदेशमधील मार्केट मक्यासाठी प्रसिध्द आहे. हे मक्याचं बेंचमार्क मार्केट आहे. या मार्केटमधल्या भावावरून मक्याचा कल लक्षात येतो. छिंदवाडा मार्केटमध्ये मक्याच्या किंमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या.
गेल्या सप्ताहात किंमती १.३ टक्क्यांनी वाढून प्रति क्विंटल २,२०० रूपयांवर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या २,२०० रूपयांवर स्थिर आहेत. डिसेंबर डिलिवरीच्या फ्युचर्स किंमती २,२१० रूपयांवर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्युचर्स किंमती २,२३४ रूपयांवर आहेत. मक्याचा हमीभाव १,९६२ रूपये आहे. यंदा मक्याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. परंतु पशुखाद्य, स्टार्च उद्योगाकडून तसेच इथेनॉलसाठी मक्याला वाढती मागणी राहील, असा तज्ज्ञांचा होरा आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम