यूपी सरकारची योजना : देशी गाय मोफत ; गुरांच्या संगोपनासाठी ९०० रुपये अनुदान

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३० नोव्हेंबर २०२२ I रसायनमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी, यूपी सरकारने नैसर्गिक शेती मंडळाची स्थापना केली आहे. आता शेतकऱ्यांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. नैसर्गिक शेतीचा खर्च कमी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना एक देशी गाय मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. गुरांच्या संगोपनासाठी दरमहा ९०० रुपये अनुदानही दिले जाणार आहे.

नैसर्गिक शेतीसाठी गाय नसलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. अशा स्थितीत कृषी विभागाकडून शेतकऱ्याला देशी गाय उपलब्ध करून दिली जाणार आहे. नैसर्गिक शेतीसाठी नोंदणीकृत शेतकऱ्यांव्यतिरिक्त, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानात नोंदणीकृत स्वयं-सहायता गट देखील गाय-आधारित शेतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील.

हे काम सुलभ करण्यासाठी ग्रामविकास विभाग शेतकऱ्यांचे छोटे क्लस्टर तयार करून त्यांचे शेतकरी उत्पादक संघटनांमध्ये रूपांतर करण्यासाठी सहकार्य करेल. यासोबतच नाबार्ड आणि यूपी डायव्हर्सिफाइड अॅग्रीकल्चर सपोर्ट प्रोजेक्ट एजन्सीही मदत करतील. पशुसंवर्धन विभाग या उपक्रमात सामील झाला असून राज्यातील 6,200 गोशाळांमधून एक देशी गाय शेतकऱ्यांना दिली जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम