सौर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ | केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो. यामधीलच एक योजना म्हणजे सौर पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

शेतकऱ्यांना सौर पंप बसवण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकार ३०-३० टक्के अनुदान देत असते. बाकीचे ३०टक्के अनुदान शेतकरी बँकेद्वारे कर्ज घेऊ शकतात.

देशातील बहुतांश भागात पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतील ओलावा कमी होत आहे. शेतं सुकत चालली आहेत. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटत आहे. त्याचबरोबर डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे सर्वच शेतकऱ्यांना सिंचनाच्या पुरेशा सुविधांचा वापर करणे शक्य होत नाही.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम