पीएम किसान योजनेचा लाभ मिळविण्यासाठी काय करावे ?

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ४ जानेवारी २०२३ । प्रधानमंत्री किसान सन्माना निधी योजनेचा 12वा हप्ता मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी लवकरात केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
PM- Kisan म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली.

या योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते.

पण, मग या योजनेसाठी कोणता शेतकरी पात्र ठरतो, असा प्रश्न आता तुमच्या मनात आला असेल. तर या योजनेसाठी सगळेच शेतकरी अर्ज करू शकतात.
सरकारनं सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आलं.

या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतरानं दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

तुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता.

ते कसं तर यासाठी Farmer Cornerमधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

या माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते.

आतापर्यंत PM-Kisanचे हप्ते सरकारनं जारी केले आहेत. त्यापैकी किती हप्ते शेतकऱ्याला मिळाले, त्याविषयीची माहिती हप्त्यानुसार दिलेली असते.

पीएम-किसान योजनेत नाव नोंदवताना आधार कार्डसंबंधीची माहिती चुकली असेल, तर दुरुस्ती करण्यासाठी तुम्हाला फार्मर कॉर्नरमधील Edit Aadhar Failure Record या पर्यायावर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर आधार क्रमांक आणि captcha टाकून सर्च या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.

त्या पेजवर आधार कार्डवर जसं नाव आहे, तसंच तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही केलेली दुरुस्ती तिथं नोंद होईल.

 

 

 

 

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम