या जिल्ह्यात बहरली गव्हाची शेती !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३ फेब्रुवारी २०२३। राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवंर परिणाम होत आहे. गेल्या आठवडाभरात असलेल्या ढगाळ वातावरणामुळं गव्हाच्या पिकावर मावा थिप्स यासारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

त्यामुळं गव्हाचे पीक धोक्यात आले होते. वातावरण निरभ्र झाल्यानंतर थंडीचा कडाका कायम राहिला असल्यानं गव्हाच्या पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे. नंदूरबार जिल्ह्यात सर्वत्र गव्हाची शेती बहरली आहे.

paid add

सध्या नंदूरबार जिल्ह्यातील शेतकरी ढगाळ वातावरणाच्या संकटातून सावरला आहे. जिल्ह्यात सर्वत्र गव्हाची शेती बहरली आहे. त्यामुळं यावर्षी गव्हाचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रब्बी हंगामातील गव्हाच्या पिकातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल. मात्र, बाजारपेठेतील भाव कायम राहण्याची शाश्वती सरकारनं द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. देशातील शेतकऱ्यांना सातत्यानं विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट शेतकऱ्यांसमोर उभी राहत आहेत. सध्या हवामान बदलाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे.

देशाच्या विविध राज्यांसह महाराष्ट्रात कधी थंडीचा कडाका तर कधी पाऊस पडत आहे. याचा शेती पिकांना मोठा फटका बसत आहे गहू, हरभरा, मोहरीनंतर आता कांदा पिकाला देखील वाढती थंडी आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता बदलत्या वातावरणाचा पिकांवर परिणाम होत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम