केळी शेतकरीला दिलासा : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ३ फेब्रुवारी २०२३।  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केळीला मोठी मागणी वाढली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीच्या दरांमध्ये चांगली वाढ झाली आहे. त्यामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जात असते. नंदूरबार जिल्ह्यात मार्च-एप्रिल महिन्यात होणाऱ्या लागवडीसाठी आतापासूनच केळीच्या रोपांची बुकिंग शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात केळीला प्रचंड मागणी वाढल्यानं व्यापारीही चांगल्या दरात केळी खरेदी करत आहेत.सध्या केळीला 1 हजार 400 ते 1 हजार 700 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे.

पिल बागेला 1 हजार 400 ते 1 हजार 700 रुपयापर्यंतचा दर मिळत आहे. हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज केळी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी केळीच्या रोपांची बुकिंग सुरू केली असून केळीची रोपे वेळेवर मिळावीत अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मागील वर्षी चार महिन्यापूर्वी केळीचे रोप बुक करुन ती वेळेवर न मिळाल्यानं शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता.
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून केळीला मिळणारा चांगला दर हा वर्षभर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळं केळीच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. लागवडीसाठी केळीच्या रोपांची बुकिंगही सुरू झाली आहे, नर्सरी चालकांनीही शेतकऱ्यांना वेळेत रोप उपलब्ध करून द्यावी हीच अपेक्षा असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे.

गेल्या पाच वर्षापासून मी केळीची लागवड करत आहे. मागच्या दोन ते तीन वर्षात केळीला चांगला दर नव्हता. मात्र, यावर्षी केळीच्या दरात चांगली वाढ झाल्याची माहिती केळी उत्पादक शेतकरी ईश्वर माळी यांनी दिली आहे. केळीला दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदी आहेत. नवीन केळीच्या सागवडीसाठी शेतकऱ्यांची बुकींग सुरु केल्याचे ईश्वर माळी म्हणाले. यावर्षी मार्चपासून जूनपर्यंतची बुकींग सुरु झाली आहे. त्यामुळं काही शेतकऱ्यांना लवकर रोपे मिळत नसल्याचे माळी यांनी सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम