कृषी सेवक । २४ जानेवारी २०२३ । देशात काही भागात सुरु असलेल्या थंडीपेक्षा राज्यातील थंडीचा जोर वाढला आहे. त्यातच शेतकरीचे हिवाळ्याच्या थंडीने मोठ नुकसान होत आहे. कुठे थंडीचा कडका, तर कुठे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्याचबरोबर या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अशात राज्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा 15 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. याचा परिणाम जनसामान्यांच्या जीवनावर होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी दाट धुके पडल्याचे चित्र समोर आले आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले आहे. याचा परिणाम थेट शेतीतील पिकांवर होत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. अशात हवामान खात्याकडून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात थंडीची लाट पसरली आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम