कपाशीच्या दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | देशातील बहुतांशी बाजार समित्यांमध्ये कापसाचा कमाल दर आता ९ हजारांच्या पुढे गेला. तर सरासरी दर ८ हजार ५०० ते ८ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान आहे. बाजारात आजही कापूस दरात क्विंटलमागे १०० ते २०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. सध्या कापसाचे दर वाढले आहेत. मात्र तरीही बाजारातील आवक अपेक्षेप्रमाणे वाढलेली नाही. त्यामुळे कापूस दर वाढत आहेत.मात्र शेतकरी याही दरात कापूस विक्री करण्यास उच्छूक दिसत नाहीत, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात काहीशी नरमाई दिसून आली. कापसाचे वायदे जवळपास अडीच टक्क्यांनी नरमले होते. बाजार समित्यांमध्ये कापसाला ८ हजार ५०० ते ९ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. तर वायद्यांमध्ये कापसाचे दर गाठीमागे १६० रुपयांनी नरमले होते. आज वायद्यांमध्ये गाठींचे व्यवहार ३३ हजार २२० रुपयाने पार पडले. एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. वायद्यांमध्ये कापूस नरमला मात्र बाजार समित्यांमधील दर तेजीत आहेत. कापूस बाजाराचा विचार करता शेतकऱ्यांना किमान सरासरी ९ हजार रुपये दर मिळू शकतो. त्यामुळं बाजाराच आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असे जाणकार तज्ञांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम