कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | राज्यात 4 ऑगस्ट 2022 पासून शासनाने गोवंशीय पशुधनामध्ये उदभवलेल्या विषाणुजन्य व सांसर्गिक लंम्पी चर्म रोग नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व गोवंशीय पशुधनास लसिकरणाची मोहीम हाती घेतली असून 30 ऑक्टोंबर, 2022 अखेर 98 टक्के पशुधनास लसिकरण करण्यात आलेले आहे. त्याच बरोबर बाधित पशुधनास शासनामार्फत मोफत औषध उपचार करण्यात येत आहे. लंम्पी चर्म प्रादुर्भावाने मृत्यू मुख पडलेल्या पशुधनाच्या पशुमालकास 100 टक्के राज्य शासनाच्या निधीतुन आर्थिक मदत देखीलदेण्यात येत आहे. तसेच राज्यातील लंम्पी चर्म रोग या सांसर्गिक रोगाचा प्रसार त्या अनुषंगाने पशुधनात मर्तुक सातत्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे यापुढे लंम्पी चर्म रोग नियंत्रण कार्यवाही जणतेच्या सहभागातुन आवश्यक आहे. यासाठी राज्यभर “माझा गोठा स्वच्छ गोठा” ही मोहीम राबविण्याचा निर्णय या विभागाने घेतला आहे.
लंम्पी चर्म रोग नियंत्रण व रोग मुक्त महाराष्ट्रासाठी “माझा गोठा स्वच्छ गोठा” या मोहिमे अंतर्गत राज्यातील बाधित शहरे, गावे, वाडयावस्त्या, पाडे व तांडे येथील पशुधनाचे सर्वेक्षण आणि लंम्पी चर्म रोग नियंत्रणासाठी पशुपालकांना जैवसुरक्षा उपाय व अनुषंगीक आवश्यक प्रशिक्षण द्यावयाचे आहे. वरील मोहीम राज्यात 7 नोव्हेंबर, 2022 पासुन ते 6 डिसेंबर, 2022 या कालावधीमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
7 नोव्हेंबर, 2022 पासुन सदरची मोहीम राबवावयाची असल्यामुळे तात्काळ पूर्व तयारी सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी मार्गदर्शक सुचना सहपत्रासोबत जोडलेले आहे. सदर मोहिमेची अंमलबजावणी करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी,
1)मोहिम कालावधीमध्ये बाधित गावामध्ये गोठा भेटी घेणेसाठी सर्वेक्षण पथके तयार करण्यात यावी. एका पथकामध्ये एक पशुवैद्यकीय अधिकारी / कर्मचारी अथवा पशुसंवर्धन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आणि स्थानिक ग्रामपंचायत/नगरपरिषद यांचेकडील 2 स्वयंसेवक समवेत राहतील.
2) सदर पथक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील गावांना मोहीम कालावधी दरम्यान भेट देईल. भेटी दरम्यान पशुपालकाचे नाव, त्यांच्या गोठ्यामधील पशुधनाचे बाधीत अबाधीत याबाबतची माहिती सोबत जोडलेल्य प्रपत्र- अ मध्ये घेण्यात यावी. 3) गोठाभेटीव्दारे लंपी चर्मरोग सदृष्य लक्षणे असणाऱ्या गोधनास जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेमध्ये तात्काळ संदर्भीत करण्यात यावे. पशुवैद्यकीय संस्थेमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भावग्रस्त पशुधनास महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाच्या सुधारीत ट्रिटमेंट प्रोटोकॉल नुसार पुढील उपचार करण्यात यावा.
4) मोहीमे दरम्यान पशुपालकांना प्रशिक्षणाच्या वेळी लंपी चर्मरोग प्रादुर्भाव संदर्भात घ्यावयाची काळजी व सूचना याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे. 5) गावातील लंपी चर्म रोग प्रतिबंधासाठी जैवसुरक्षा उपाययोजनांचे प्रशिक्षण देण्यात यावे. 6) मार्गदर्शक सुचनेमध्ये नमुद केल्यानुसार पशुवैद्यकीय संस्थानिहाय पथके तयार करण्याबाबतचे आदेश निर्गमित करणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि साहित्य वाटप करावे. 7) बाह्य किटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विद्यापिठाने प्रसारीत केलेल्या सुधारीत मार्गदर्शक तत्वानुसार गोठ्याची स्वच्छता, परिसर स्वच्छता, पशुधनाच्या शरीरावरील किटकांचे व्यवस्थापन, इत्यादीची तातडीची अमलबजावणी करण्यात यावी, यासाठी आवश्यक किटकनाशके व साधन सामग्री सर्व संस्थांना उपलब्ध करण्यात यावी. 8) लोकप्रतिनिधी, ग्रामविकास, महसुल विभागातील अधिकारी कर्मचारी खाजगी पशुचिकित्सक व सेवादाता यांचा या मोहीमेसाठी सहभाग घेण्यात यावा. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद जळगाव डॉ. एस.व्ही. सिसोदे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम