मुद्रा लोन योजनेअंतर्गत 10 लाखापर्यंत कर्ज

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २४ नोव्हेंबर २०२२ | मुद्रा लोन योजना 8 एप्रिल 2015 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत लोकांना किती रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते,या योजनेसाठी अर्ज कसा व कोठे करायचा आणि या योजनेचा लाभ कोणा कोणाला मिळू शकतो, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.मुद्रा लोन योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश हा आहे, की ज्या व्यक्तींना शेती नाही त्याचबरोबर ज्यांचा छोटा उद्योग आहे त्यांना ही योजना 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेअंतर्गत व्यक्तींना छोट्या मोठ्या कामासाठी कर्ज दिले जाते. देशातील प्रत्येक व्यक्तीला नोकऱ्या देण्यापेक्षा त्या व्यक्तीला काहीतरी काम मिळावे म्हणून केंद्र सरकार अशा अनेक योजना राबवत आहे. नोकरीमध्ये पूर्ण आयुष्य घालण्यापेक्षा लोकांनी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि दुसऱ्यांना रोजगार द्यावा असा केंद्र सरकारचा योजना राबवण्यामागचा उद्देश आहे.मुद्रा लोन योजनेअंतर्गत सहज आणि अतिशय स्वस्त व्याजदरात कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना कर्ज घेण्याची गरज आहे त्यांना 50 हजार ते 10 लाख रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाते.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम