१२ कोटीचा रेडा ‘या’ प्रदर्शनात येणार मैदानात !

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २३ जानेवारी २०२३ ।  राज्यात होणारे भीमा कृषी प्रदर्शन येत्या २६ जानेवारीपासून सुरु होणार आहे. त्यामुळे राज्यासह देशातील शेतकरी या प्रदर्शनात सहभागी होणार आहे. हे प्रदर्शन मेरी वेदर मैदानावर होणार आहे. यावर्षी काय आकर्षण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

२६ जानेवारी पासून सुरु झालेले हे प्रदर्शन रविवारी २९ जानेवारीपर्यंत सुरू असणार आहे. या प्रदर्शनात आधुनिक शेती, पशुपालन, कृषी उत्पादने यांची विविध दालने असतील, तसेच सेंद्रिय शेती, गोड्या पाण्यातील मोत्यांची शेती, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग, मत्स्यपालन याचे प्रात्यक्षिक बघायला मिळणार आहेत.

paid add

तसेच प्रदर्शनामध्ये 250 जनावरे असतील. यामध्ये तब्बल 12 कोटी किंमतीचा जगातील सर्वांत उंच बादशाह रेडा आणि प्रतिलिटर 31 लिटर दूध देणारी बिजली म्हैस हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगितले. यावेळी महाडिक म्हणाले की, कोरोनामुळे दोन वर्षे हे भीमा कृषी प्रदर्शन घेता आले नाही. मात्र, यंदा शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा ही पर्वणी उपलब्ध झाली आहे. प्रदर्शनात ड्रोन टेक्नॉलॉजीची माहिती देणारे दालन आहे.

प्रदर्शनात तृणधान्याचे प्रकार, उत्पादने, खाद्यपदार्थ यांची माहिती देणारे स्वतंत्र दालन येथे असणार आहे. म्हशी, रेडे, गायी, बैल, शेळ्या, कोंबड्या, परदेशी पक्षी प्रदर्शनात असतील. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम