मोठी बातमी..! इथेनॉल निर्मितीस परवानगी; केंद्र सरकारचा निर्णय!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २६ आप्रिल २०२४ । महाराष्ट्रसोबत देशातील साखर उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने उसाच्या मळीपासून इथेनॉल निर्मिती करण्यास आता परवानगी दिली आहे. आता इथेनॉल निर्मितीला चालना मिळणार आहे. तसेच, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल ३८ कोटी लिटरची इथेनॉल निर्मिती होणार आहे. तसेच, सरकारच्या इथेनॉल निर्मितीला परवानगी देण्याच्या सदर निर्णयामुळे बी हेवीच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेली ७०० कोटी रुपयांची रक्कम खुली होण्यास देखील मदत होणार आहे.

सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार रुपये जमा!

देशातील साखर कारखान्यांकडे सध्या ६.७ लाख टन बी हेवी मोलँसिस पडून आहे. देशातील साखरेचे उत्पादन कमी होईल, या भीतीने ७ डिसेंबर २०२३ रोजी केंद्र सरकारने बी हेवी मोलँसिसपासून इथेनॉल बनविण्यास बंदी घातली होती. तेव्हापासून सदर साठा साखर कारखान्यांकडे पडून होता. यापासून इथेनॉल बनविण्यास परवानगी द्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना पाठविला होता. या प्रस्तावावर विचार केल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने देशातील साखर कारखान्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

paid add

४० म्हशींचा गोठा, २५० लिटर दूध; शेतकरी करताय साडेचार लाखांची कमाई!

तसेच, केंद्र सरकारने बंदी इथेनॉल निर्मितीस बंदी घातल्याने, साखर कारखान्यांकडे पडून असलेला बी हेवी मोलँसिसचा साठा मोकळा होण्यास मदत होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी चुकती करायची असल्याने, कारखाने देखील आर्थिक संकटात होती. ऊस उत्पादकांना त्यांचे पैसे वेळेवर देणेही आता साखर कारखान्यांना शक्य होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन देशभरातील साखर उद्योगाला आणि उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम