राज्यातील २१ साखर कारखान्यांना कर्जाची हमी; २१ पैकी १५ कारखाने राजकीय नेत्यांचे!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २५ आप्रिल २०२४ । महाराष्ट्रसह देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच आता महाराष्ट्रराज्यात लोकसभा निवडणुक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्य सरकारने, राज्यातील २१ साखर कारखान्यांना कर्ज देण्याची हमी दिल्याची माहिती आपल्या समोर आली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारच्या सदर निर्णयांमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील २१ साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने महिनाभरापूर्वी कर्जाची हमी दिल्यानंतर सहकार विभागाने कारखान्यांची यादी देखील तयार केली असल्याचे सांगितले जात आहे.

बटाटा, केळीसह २० पिकांच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारचा प्लॅन; शेतकऱ्यांना फायदा होणार!

सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारकडून कर्जाची देण्यात आलेल्या २१ कारखान्यांपैकी १५ कारखाने हे राजकीय नेत्यांकडून सांभाळले जात आहे. हे १५ राजकीय नेते सत्तेत सहभागी झाले आहेत. तर या कारखान्यांपैकी दोन कारखाने शिंदे गटाच्या नेत्याकडून सांभाळले जात आहे. पाच कारखाने हे अजित पवारांकडून सांभाळले जात आहेत. तर एक कारखाना हा काँग्रेस नेता असून, त्यांनी निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर एक कारखाना ही सोलापूरमधील माजी आमदार भारत भालके यांचे सुपूत्र सांभाळत आहे.

सहा कारखाने हे सत्ताधारी पक्षांमधील एक जोडपे सांभाळत आहेत. एका कारखाना हा काँग्रेस नेत्याचा आहे. तर दोन कारखाने हे अपक्ष नेत्यांकडून सांभाळले जात असून एक कारखाना हा राजकीयदृष्ट्या तटस्थ नेत्यांकडून सांभाळला जात आहे. महाराष्ट्रातील बहुतांश सहकारी कारखाने हे आमदार , खासदार आणि मंत्र्यांकडून सांभाळले जातात. परंतु, महाराष्ट्रातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना कर्जाची हमी मिळालेली नाही.

अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडेना; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

गेल्या सप्टेंबर महिन्यात फक्त पाच कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून १७८.२८ रुपये कर्जाची हमी मिळाली. तर २०२२-२३ या वर्षात या बँकेने ३४ कारखान्यांना ८९७.६५ कोटींचा कर्ज पुरवठा केला होता. त्यापैकी १७८.२८ कोटी रुपयांची कर्ज हमी ही सहा कारखान्यांना दिली होती. सहकारी कारखाने कर्जाद्वारे एकूण १०००० कोटी रुपये उभारतात, अशी माहिती उद्योगक्षेत्रातुन सांगितली जात आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम