अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडेना; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ एप्रिल २०२४ | राज्यात अवकाळी पाऊस जोराने चालू आहे. पूर्ण एप्रिल महिनाभर महाराष्ट्र राज्यात भाग बदलत पाऊस बघायला मिळाले. सदर अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र राज्यातील १ लाख हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान झाले. अशातच आता पुन्हा एकदा पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रात मेघगर्जनेसह हलका ते मध्यम रुपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या मध्ये प्रामुख्याने विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट देखील होऊ शकते. असे भारतीय हवामानशास्र विभाग आयएमडी ने म्हटले असून येते ४ ते ५ दिवसात राज्यासह मध्य भारतात कमाल तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ होण्याची शक्यता असून हवामान विभागाने आपल्या अंदाजात म्हटले आहे.

२५ एप्रिल २०२४ – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बीड, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली – यलो अलर्ट. (Weather Update)

२६ एप्रिल २०२४ – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बीड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली – यलो अलर्ट.

paid add

२७ एप्रिल २०२४ – पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली – यलो अलर्ट.

तसेच, महाराष्ट्रात प्रामुख्याने कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पुढील २४ तासात उष्णतेमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे. तर मागील २४ तासांमध्ये राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी राज्यातील उच्चांकी ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय धुळे ४१, जळगाव ४०.८ आणि चंद्रपूर ४०.८ येथे ४० अंशांहून अधिक तापमान नोंदवले गेले आहे. ज्यामुळे सध्या कमाल तापमान काहीसे घटले आहे. मात्र, आता त्यात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम