कृषी सेवक । २५ आप्रिल २०२४ ।महाराष्ट्रात दूध व्यवयासाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसले तरी अनेक शेतकरी दुग्ध व्यवसायातून आपली प्रगती साधत आहे. आज आपण जालना तालुक्यातील निधोना गावच्या एका शेतकऱ्याच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाबाबत जाणून घेणार आहोत. ज्यांनी आपला तब्बल ४० पंढरपुरी म्हशींचा गोठा उभारला. ज्यातून शेतकरींना मासिक साडेचार लाखांची बक्कळ कमाई होत आहे.
ढीगभरकष्ट करून देखील नुकसान; यंदा “त्याच” आले पिकातून बिघ्यात केली सहा लाखांची कमाई!
तुकाराम शहापूरकर असे शेतकऱ्याचे नाव आहे. शहापूरकर हे जालना तालुक्यातील निधोना परिसरातील आंबेडकरनगर येथील रहिवासी आहेत. शेतकरी तुकाराम शहापूरकर यांनी केवळ शेतीच्या मागे न लागता, आपला दुग्ध व्यवसाय देखील करत आहे. शहापूरकर याना आपल्या शेतीमध्ये नेहमीच आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते. कधी दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस तर कधी बाजारभाव न मिळणे, यामुळे ते वैतागले होते. ज्यातून मार्ग काढण्यासाठी शहापूरकर यांनी डेअरी व्यवसायाची कास धरत, आज मोठी प्रगती साधली आहे.
पावसामुळे डागाळलेल्या आंब्याचे असे करा व्यवस्थापन!
शेतकरी तुकाराम शहापूरकर हे सांगतात की, गोठ्यातील ४० म्हशींचे सकाळी १५० आणि सायंकाळी १०० लिटर दूध मिळत असते. विशेष म्हणजे ते आपले दूध कोणत्याही दूध संघाला न देता, स्वतः दुचाकीद्वारे शहरातील विविध हॉटेल आणि घरोघरी जाऊन विक्री करतात. त्यांना आपल्या म्हशीच्या दुधाला एक लिटरला ६० ते ७० रुपये याप्रमाणे दर मिळतो. अर्थात २५० लिटर दूध दररोज मिळत असल्याने, त्यांना २५० लिटर दुधाला ६० ते ७० रुपये दर याप्रमाणे एका दिवसाला १५ हजार रुपयांची कमाई होत असल्याचे शहापूरकर सांगतात.
अखेर १३ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!
सध्याच्या घडीला दुग्ध व्यवसायामध्ये शहापूरकर यांनी हळूहळू प्रगती करत, मोठी उंची गाठली. ४० म्हशींसाठी त्यांनी आधुनिक गोठा उभारला आहे. याशिवाय आपल्या ४० म्हशींसाठी ते दिवसभरात ओला चारा, पेंड, मुरघास यासाठी जवळपास चार हजार रुपये खर्च करतात. हा खर्च वगळता दिवसाला त्यांना म्हशींच्या दुध विक्रीतून १५ हजार रुपये नफा तर मासिक साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकरी तुकाराम शहापूरकर सांगतात.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम