ढीगभरकष्ट करून देखील नुकसान; यंदा “त्याच” आले पिकातून बिघ्यात केली सहा लाखांची कमाई!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २५ आप्रिल २०२४ । शेती करताना प्रत्येक शेतकऱ्यांला नुस्कान हे काही नवीन नाही. ढीगभरकष्ट करून देखील शेतकऱ्यांना शेतीतून हवे तसे उत्पन्न मिळेल की नाही? याची भीती असते. नैसर्गिक आपत्तीचा सामना, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे होणारा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. ज्यामुळे कधी एखाद्या पिकाला बाजारभाव नाही मिळाला तर संपूर्ण पिकाचा खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर पडतो. तर कधी शेतकऱ्यांना एखाद्या पिकातून अधिकचा नफा देखील आपण अशाच शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी दोन वर्षांपूर्वी योग्य भाव मिळत नसल्याने, आपल्या आले पिकावर रोटाव्हेटर फिरवले होते. परंतु, यंदाच्या वर्षी त्यांना याच आले पिकातून किमान सहा लाखांची बक्कळ कमाई झाली.

अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडेना; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

विष्णू पाचे असे सदर शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी विष्णू पाचे हे सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावचे रहिवासी आहेत. विष्णू पाचे हे गेल्या ३ वर्षांपासून आले शेती करत आहे. परंतु, गेल्या २ वर्षांपूर्वी पिकाला हवा तसा भाव मिळत नसल्याने, विष्णू पाचे याना आले पीक काढणीला देखील परवड नव्हते. ज्यामुळे त्यांनी त्यावेळी केलेला उत्पादन खर्च अंगावर घेतला. आणि भाव मिळत नसल्याने त्यावर रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ शेतकरी विष्णू पाचे यांच्यावर आली होती. परंतु, याही परिस्थितित अपयशाने खचून न जाता विष्णू पाचे यांनी आले पिकाचे उत्पादन घेणे थांबवले नाही.

अखेर १३ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

paid add

शेतीत परिस्थिती नेहमी सारखी नसते. शेतकरी नेहमीच अपयशातून पुढे जात असतात. ते जिद्दीने आपल्या पिकांच्या लागवड करणे सोडत नाही. याच मार्गाने जात विष्णू यांनी देखील आले पिकाचे उत्पादन घेणे चालूच ठेवले. शेतकरी विष्णू पाचे यांनी यंदा आपल्या एक बिघ्यात आले लागवड केली होती. त्यांचे आले पीक सध्या काढणीला आले आहे. त्यांना एका बिघ्यात विक्रमी ७० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी विष्णू पाचे हे सांगतात.

तब्बल १७६.९२ कोटी रुपये दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या खात्यात जमा!

शेतकरी विष्णू सांगतात कि, यंदा लागवडीपासून आपण आले पिकाकडे विशेष लक्ष दिले. ज्यामुळे यंदा आपल्याला बिघ्यात ७० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. सध्याचा आले काढणी सुरु आहे. बाजारात आल्याला ८५०० ते ९००० हजार रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे. ज्याद्वारे आपल्याला एका बिघ्यात एकूण ७० क्विंटल आले उत्पादनाच्या माध्यमातून एकूण सहा लाखांचे उत्पन्न मिळणार असल्याचे शेतकरी विष्णू पाचे हे सांगतात.

 

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम