अखेर १३ बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरु; शेतकऱ्यांना मोठा दिलासा!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २५ एप्रिल २०२४ | लेव्ही संदर्भात प्रश्न पेटल्याने गेल्या २५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज पूर्णपणे ठप्प होते. व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकल्यामुळे कांदा व इतर शेतीमालाचे लिलाव बंद होते. राज्याच्या सहकार विभागाने व्यापाऱ्यांना कारवाईचा इशारा दिल्यानंतरही व्यापारी ऐकण्याच्या स्थितीत नसून सर्वच स्तरावर ओरड झाल्याने व्यापाऱ्यांनी अखेरीस बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील तेराहून अधिक बाजार समित्यांमध्ये लिलाव प्रक्रिया दि. २३ एप्रिल पासून सुरु झाली.

नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमधील लेव्हीचा तिढा कायम. परंतु, शेतकऱ्यांच्या हितासाठी १३ बाजार समित्या व उप बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरू झाले. यामध्ये प्रामुख्याने नांदगाव, मनमाड वगळता इतर बाजार समित्यांमध्ये शेतीमालाची विक्री सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता लिलाव सुरु झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच, यापूर्वी लासलगांव बाजार समितीने १२ एप्रिल रोजी याआधीच आपले लिलाव सुरु केले आहेत.

paid add

नाशिक जिल्हा व्यापारी असोसिएशनमार्फत १ एप्रिल २०२४ पासुन जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्री केलेल्या शेतकरी बांधवांच्या हिशोब पावतीतुन हमाली, तोलाई व वाराईची रक्कम कपात न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लासलगांवसह जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमधील कांदा, भुसार व तेलबिया ह्या शेतीमालाचे लिलाव तेव्हापासून बंद ठेवले होते. परंतु, आता हळूहळू बाजार समित्यांमध्ये लिलाव सुरु झाले आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम