देशातील सोयाबीन बाजार स्थिर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १२ डिसेंबर २०२२ I अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीने जगातील सोयाबीन उत्पादनाचा अंदाज कायम ठेवला. अर्जेंटीना आणि ब्राझीलमधील दुष्काळी स्थितीमुळे मागील काही दिवसांपासून युएसडीए या देशांमधील उत्पादनाचा अंदाज कमी करेल, अशी शक्यता होती. मात्र तसे झाले नाही. त्यातच आज पामतेलाचे दरही काहीसे नरमले.

paid add

त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन दर काहीसे नरमले होते. मात्र देशात सोयाबीन दर कायम होते. आज सोयाबीनला प्रतिक्विंटल सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये दर मिळाला. या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारासह देशातही सोयाबीन दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम