उडदाला ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २८ डिसेंबर २०२२ Iदेशात सध्या उडदाचे दर चांगले आहेत. उडदाला सध्या सरासरी ६ हजार ८०० ते ७ हजार ५०० रुपये दर मिळतोय. यंदा खरिपातील उडीद उत्पादन कमी राहीले. तसंच भारताचा मुख्य उडीद पुरवठादार असलेल्या म्यानमारमध्ये सध्या उडदाची उपलब्धता कमीच आहे. म्यानमारमध्ये उडदाची आवक जानेवारीत सुरु होते. मात्र आवकेचा मुख्य हंगाम फेब्रुवारीत असतो. त्यामुळं दोन महिने तरी म्यानमारमधून आयात कमी होईल. त्यामुळं देशातील उडीद बाजाराची मदार आता तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील पिकावर आहे. या राज्यांतील उडीद लवकर बाजारात येईल. मात्र सध्या देशात उडदाचा पुरवठा कमी असल्याने दर तेजीत आहेत. यंदा सरकारने उडदाला प्रतिक्विंटल ६ हजार ६०० रुपये हमीभाव जाहीर केला. पण सध्याचे दर त्यापेक्षा जास्त आहेत.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम