कृषी सेवक | ७ नोव्हेंबर २०२२ | लासलगाव बाजार समितीच्यामुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ७० हजार ७४८ क्विंटल आवक झाली .
गेल्या सप्ताहात लासलगाव बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारावर उन्हाळ कांद्याची ७० हजार ७४८ क्विंटल आवक (Onion Arrival) होऊन बाजारभाव किमान ८००, कमाल ३,२६० तर सर्वसाधारण रुपये २,४८७ प्रती क्विंटल राहीले.
लासलगाव मुख्य बाजार आवारावरील भुसार व तेलबिया शेतीमालाचे प्रती क्विंटल बाजारभाव गहु (३६६ क्विंटल) भाव १,५०० ते ३,४०१ सरासरी २,७७२ रुपये, बाजरी लोकल (११३ क्विंटल) भाव १,८०० ते ३,१०१ सरासरी २,३४१ रुपये, ज्वारी लोकल (०९ क्विंटल) भाव १,९०१ ते २,९०० सरासरी २,२८४ रुपये,
हरभरा लोकल (५१ क्विंटल) भाव ३,५०० ते ५,८७१ सरासरी ४,४८४ रुपये, हरभरा जंबु (३१ क्विंटल) भाव ३,७७५ ते ६,५०१ सरासरी ५,१९० रुपये, हरभरा काबुली (७४ क्विंटल) भाव ३,८०० ते ७,९०१ सरासरी ६,२३७ रुपये, सोयाबीन (२०,४१२ क्विंटल) भाव ३,००० ते ५,४५१ सरासरी ५,२०५ रुपये, मूग (११२ क्विंटल) भाव ३,००० ते ८,५३० सरासरी ८,०७० रुपये, मका (१०,८७५ क्विंटल) भाव १,५०० ते २,१४२ सरासरी २,०४२ रुपये प्रती क्विंटल राहीले.
निफाड उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव : उन्हाळ कांदा (७,२८० क्विंटल) भाव रुपये ८०० ते २,७७५ सरासरी रुपये २,४२१, सोयाबीन (१०,४२३ क्विंटल) २,४०० ते ५,५१७ सरासरी ५,२०० रुपये, मका (५५५ क्विंटल) १,८०१ ते २,१८१ सरासरी २,१३२ रुपये, बाजरी (०२ क्विंटल) २,२०१ ते २,५३२ सरासरी २,४०१ रुपये, गहू (१११ क्विंटल) २,२०० ते २,७९१ सरासरी २,५४१ रुपये, मुग (०९ क्विंटल) १,५०० ते ६,८१२ सरासरी ६,००० रुपये, हरभरा (३६ क्विंटल) ३,५०१ते ५,१५१ सरासरी ४,२२८ रुपये प्रति क्विंटल राहीले.
विंचूर उपबाजार आवारावरील आवक व बाजारभाव : उन्हाळ कांदा (४८,६६० क्विंटल) भाव रुपये ७०० ते ३,२४० सरासरी रुपये २,५००, गहू (७७ क्विंटल) २,४०० ते ३,१०० सरासरी २,५०० रुपये, बाजरी (०६ क्विंटल) १,७५१ ते २,५०० सरासरी २,००० रुपये, मका (३,०८२ क्विंटल) १,३११ ते २,१४१ सरासरी १,९०० रुपये, मुग (१७ क्विंटल) २,००० ते ७,८०० सरासरी ६,५०० रुपये, सोयाबीन (२७,२३०) क्विंटल ५,००० ते ५,५०१ सरासरी ५,१५० रुपये प्रती क्विंटल राहीले, अशी माहिती बाजार समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम