कृषी सेवक I १७ डिसेंबर २०२२ I बांबूची एकदा लागवड केली तर तुम्ही 40 वर्षापर्यंत या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतात. तसेच भारत सरकारने देखील बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळावे यासाठी राष्ट्रीय बांबू मिशनची सुरुवात केलेली आहे. या मिशनच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना बांबूच्या रोप खरेदीवर अनुदान मिळते.
बांबू लागवडीतील महत्त्वाच्या बाबी
बांबू लागवड करायची असेल तर च्या शेतामध्ये तुम्हाला लागवड करायची आहे त्यामध्ये तुम्हाला दुसरे कुठलेही प्रकारचे पीक घेता येत नाही. कारण एकदा लागवड केली की 40 वर्षे तुम्हाला त्या क्षेत्रातून आमचे उत्पादन मिळते. त्यानुसार जमिनीचे क्षेत्र ठरवणे गरजेचे आहे. जर हेक्टरी लागणाऱ्या रोपांचा विचार केला तरपंधराशे झाडे एका हेक्टर मध्ये लागतात असे तज्ञांचे मत आहे.
बांबूची काढणी बाजारातील स्थिती किंवा गरजेनुसार करता येते. कारण बांबू खराब होत नाही किंवा कालांतराने त्याचा दर्जा देखील खराब होत नाही. बाबू लागवड प्रामुख्याने आसाम, कर्नाटक, नागालँड, त्रिपुरा, ओरिसा, गुजरात आणि महाराष्ट्र इत्यादी राज्यातील माती आणि हवामान बांबू लागवडीला अनुकूल आहे
बांबू लागवडीसाठी शासन देते अनुदान
बांबू लागवडीला चालना देण्यासाठी भारतात राष्ट्रीय बांबू मिशन राबविण्यात येत आहे. यासोबतच बांबू लागवडीसाठी सरकारकडून ५० टक्के आर्थिक मदतही दिली जाते.अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा राष्ट्रीय बांबू अभियानाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता https://nbm.nic.in/ “> https://nbm.nic.in/ अंदाजानुसार , बांबू लागवडीसाठी 1 रोप 240 रुपयांना उपलब्ध आहे, त्यावर शासनाकडून प्रति रोप 120 रुपये अनुदान मिळते.
एका एकरात 1500 झाडे लावता येतात, ज्यामध्ये एकूण 3 लाख 60 हजार खर्च करता येतो. यामध्ये शेतकऱ्याला 1 लाख 80 हजारांपर्यंतचे अनुदान मिळू शकते. हे पूर्णपणे शेतकऱ्यावर अवलंबून असते की त्याला किती क्षेत्रात बांबूची लागवड करायची आहे किंवा कोणत्या प्रकारची बांबू लावायची आहे. या संदर्भात भारतीय आणि परदेशी बाजारपेठेतील मागणीचीही काळजी घ्यावी लागेल, जेणेकरून अधिकाधिक फायदा मिळू शकेल.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम