हरभऱ्यामध्ये काहीशी तेजी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I देशात सध्या हरभरा पेरणी सुरु आहे. सुरुवातीच्या टप्प्यात गेल्यावर्षीपेक्षा हरभरा लागवड अधिक दिसत असली तरी यंदा लागवड कमी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यातच देशात लग्नसराई सुरु झाल्याने महत्वाच्या बाजारापेठांमध्ये हरभरा दरात क्विंटलमागे १०० रुपयांची वाढ दिसून आली. मात्र नाफेडच्या विक्रीचा दबाव बाजारावर कायम आहे. त्यामुळे हरभरा दरात फार मोठ्या तेजीची अपेक्षा नाही, असा अंदाज हरभरा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम