कापूस दरातील चढ उतार कायम

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात सध्या चढ-उतार सुरु आहेत. चीनकडून कापसाला मागणी वाढण्याचा अंदाज असल्याने जागतिक कापूस बाजाराला आधार मिळाला. देशात नोव्हेंबरच्या तुलनेत सध्या कापसाचे दर क्विंटलमागे ७०० रुपयांपर्यंत नरमले आहेत. सध्या कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ३०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहे. मागील दोन दिवसांमध्ये कापूस दर काहीसे स्थिर आहेत. तर चालू महिन्यात कापूस दरात चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे. मात्र जानेवारीत कापूस दरात सुधारणा पाहायला मिळू शकते, असा अंदाज कापूस बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम