काकडीचे दर टिकून

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ६ डिसेंबर २०२२ I राज्यातील बाजारात काकडीची आवक कमी आहे. मात्र सध्या थंडी कमी झाल्याने काकडीला चांगला उठाव मिळत आहे. परिणामी काकडीचे दरही चांगले आहेत. सध्या काकडीला प्रतिक्विंटल १३०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील. तसेच उन्हाचा कडाका वाढल्यानंतर काकडीला मागणी वाढून दरही सुधारतील, असा अंदाज भाजीपाला बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम