वाशिमच्या शेतकऱ्याच्या मुलाला मिळाली १ कोटीची शिष्यवृत्ती

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ | विदर्भातील शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेल्या समाधान कांबळेया तरुणाने विदेशातील १ कोटीची शिष्यवृत्ती मिळावली.

 

वाशिम जिल्ह्यातील पांगरी धनकुटे येथील शेतकरी कुटुंबातला समाधान हा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. उच्च शिक्षण घेण्यासाठी तो आता ऑस्ट्रेलियाला जाणार आहे.समाधान आणि त्यांचे आई वडील आणि पाच बहिणी असे त्याचे कुटुंब आहे. विदर्भासारख्या भागातून पुण्यात येऊन समाधानने अभ्यास करून यश मिळवले आहे.समाधानचे आई-वडील शेतात मजूरी करतात. मजुरीच्या पैशातून त्यांनी समाधानला उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवले. पुण्यातील सिंहगड इंजिनियरिंग कॉलेजमधून त्याने सिव्हिल इंजिनियरिंग पूर्ण केले. इंजिनियरिंगमध्ये त्याने द्वितीय क्रमांक पटकवला. समाधानच्या घरची परिस्थिती हालखीची होती.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम