कृषी सेवक | २६ नोव्हेंबर २०२२ | पांरपरिक व्यवस्थेतून बाहेर पडत गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीपन्नास वर्षांनंतर डिजिटल झाली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांना शेतमालाचे भाव समजण्याचा मार्ग सुकर करण्यासाठी मोबाईल ॲप विकसित केले आहे.
तसे करणारी बहुधा जिल्ह्यातील पहिलीच बाजार समिती असावी. मुख्य प्रशासक ऋषिकेश पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, संपूर्ण व्यवहारच संगणकीकृत झाला आहे.गंगापूर बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात तालुक्यातील १८३ गावांचा समावेश आहे. १० हजारांवर शेतकऱ्यांनी बाजार समितीचे ॲप मोबाईलमध्ये घेतले आहे. या ॲपमुळे संगणकीकरणामध्ये प्रत्येक वाहनांमधील शेतीमालाची प्रवेशद्वारावर संगणकीकृत नोंद होत आहे. खुल्या पद्धतीचा लिलाव होऊन प्रत्येक शेतीमालाचे डाग कोणत्या अडत्याच्या गाळ्यावर आले आहेत, याची नोंद होऊन त्याचा संदेश मोबाईलवर पाठविण्यात येत आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम