कृषी सेवक । ५ मे २०२४ । आगामी खरीप हंगामापूर्वी रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. शेतमालाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर जवळपास अनिवार्यच झाला आहे. त्यामुळे शेतीच्या उत्पादन खर्चात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यात गेल्या काही वर्षांत सततची वाढच होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडत आहे.
शेतकऱ्यांना सध्या १०.२६.२६ खताची गोणी १४७० रुपयांना मिळते. जी आता १७०० रुपयांना मिळणार आहे. खताची २४.२४.० ही गोणी सध्या १५५० रुपयांना मिळते. जी आता १७०० रुपयांना मिळणार आहे. याशिवाय २०.२०.०.१३ ही खताची गोणी १२५० रुपयांना मिळते. जी आता १४५० रुपयांना मिळणार आहे. सुपर फॉस्फेटची गोणी सध्या ५०० रुपयांना मिळते. जी आता नवीन दरानुसार ६०० रुपयांना मिळणार आहे.
तुरीच्या भावात ५०० रुपयांची घसरण; शेतकरी परेशान!
अर्थात मिश्र खते, सुपर पोटॅशच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. त्यासोबतच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरच्या आधारे होणाऱ्या आंतरमशागतीच्या खर्चातही मोठी वाढ झाली आहे. ट्रॅक्टरने होणाऱ्या नांगरणीच्या खर्चात प्रति एकर ३०० रुपयांपर्यंत वाढ खोल नांगरणीचा खर्च दोन हजार रुपये प्रति एकरवर पोहोचला आहे. ज्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ होणार आहे. ज्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक कसरत करणारा ठरणार आहे. या हंगामात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
शेतीच्या उत्पादन खर्चात वाढ होत असताना शेतमालाच्या भाव कमी होत आहे. यामुळे शेतीवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. उत्पादन खर्चात सर्वात महत्त्वाचा घटक असलेल्या खतांच्या भावातच वाढ होत असल्याने शेती आता आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम