कृषी सेवक । ७ एप्रिल २०२४ । महाराष्ट्रात कापूस लागवड हंगामाबाबत राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यंदाच्या खरीप हंगामात कापूस पिकावर अळींचा प्रादुर्भाव होऊ नये. यासाठी कृषी विभागाने १६ मे २०२४ पासून कापूस बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी बियाण्याची विक्री केल्यास संबंधित कंपनी, किरकोळ विक्रेत्यावर कारवाई होणार आहे. याविषयी कृषी विभागाने विभागीय कृषी सहसंचालक यांना आदेश निर्गमित केले आहे. त्यामुळे आता कृषी विभागाकडून कापूस पिकावरील कीड नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न केले जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.
कृषी विभागातील तज्ज्ञांच्या मते, शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे आढळून येत आहे. हंगाम पूर्व कापूस लागवड झाल्यास शेंदरी बोंड अळीचा जीवनक्रमास पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. ज्यातून या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत यंदा शेंदरी बोंड अळीच्या प्रादुर्भावास आळा घालण्याकरिता हंगाम पूर्व कापसाची लागवड करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.
जिरॅनियम शेती शेतकऱ्यांसाठी दुहेरी फायदा;जाणून घ्या लागवडीचे तंत्रज्ञान!
विभागाच्या माहितीप्रमाणे, कापूस बियाणे पुरवठा करण्यासाठी पुढीलप्रमाणे निर्देशित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने कापूस बियाणे उत्पादक कंपनी ते आपले उत्पादित बियाणे १ ते १० मे 2024 या कालावधीत वितरित करू शकणार आहे. त्यानंतर वितरक हा १० मे २०२४ नंतर किरकोळ विक्रेत्यांना हे बियाणे देऊ शकणार असून १५ मे २०२४ नंतरच किरकोळ विक्रेते हे शेतकऱ्यांना कापूस बियाणे विक्री करू शकणार आहे. तसेच शेतकऱ्यांना देखील १ जूननंतरच प्रत्यक्ष कापूस लागवड करता येणार आहे. असेही कृषी विभागाने सांगितले आहे.
रासायनिक खतांच्या किंमतीत मोठी वाढ; सविस्तर वाचा काय आहेत गोण्यांच्या नवीन किमती?
तसेच, कापूस बियाण्याची विक्री दुकानदार शेतकऱ्यांना १५ मे २०२४ नंतर करू शकणार असून शेतकऱ्यांनी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी १ जूननंतरच कापूस बियाण्याची लागवड करावी. असे आवाहन देखील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम