फुले कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला सायबर सेलने केली अटक

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ३० ऑक्टोबर २०२२ | राहुरी येथील महात्मा फुले विद्यापीठातील एका विद्यार्थ्याला महाराष्ट्र सायबर सेलने अटक केली आहे. गणेश नारायण गोटे (वय २९) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.आरोपींकडून २ मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. त्याला कोर्टात हजर करून २ नोव्हेंबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आल्याचं महाराष्ट्र सायबर एसपी संजय शिंत्रे यांनी सांगितलं.

ट्विटर हँडल वापरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि काही महिला पत्रकारांबद्दल चुकीच्या पद्धतीने असभ्य टिप्पण्या पोस्ट केल्याबद्दल अटक केली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सायबर अधिकाऱ्याने माहिती दिली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम