साखर कारखान्यांना मिळणारे अतिरिक्त उत्पन्न; ऊस उत्पादकांच्या खात्यात केव्हा येणार?

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २० मे २०२४ | साखरेसह उपपदार्थांना बाजारात चांगले दर मिळत असल्याने, शेतकऱ्यांना एफआरपी देऊनही साखर कारखान्यांकडे अतिरिक्त पैसे शिल्लक राहतात. पण हे पैसे शेतकऱ्यांना दिले जात नाहीत, असे अनुभव गेल्या दोन वर्षांत आले आहेत.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांना कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा विषय पत्रिकेत घेऊन मंजुरी देण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

जैविक खत द्याल तर जमिनीचे होईल सोने; पीक येईल मोत्यांसारखे

गेल्या दोन वर्षांत केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांनी ऊसापासून इथेनॉल निर्मितीला प्राधान्य दिले आहे. यामुळे साखर, इथेनॉल, बगॅस, को-जन, स्पिरीट, अल्कोहोल, मळी यासारख्या उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे.

साखर कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा जाता अतिरिक्त पैसे शिल्लक राहू लागले आहेत. गतवर्षी सोमेश्वर, माळेगाव, विघ्नहर, भीमाशंकर या कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत एफआरपीपेक्षा जादा रकमेस मंजुरी देऊन शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे दिले.

मात्र, राज्यातील इतर कारखाने वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर न करता, सरकारकडे कारणे दाखवून या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत.

मोसमी पावसाचा प्रवास कसा असेल? हवामान विभागाची माहिती…

यामुळे चालू हंगामातील साखर व उपपदार्थांच्या जादा उत्पन्नातील आलेले पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी, साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत हा विषय पत्रिकेत घेऊन मंजुरी देण्याचे लेखी आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यामुळे राज्यातील सर्व कारखान्यांना लेखी आदेश दिल्यास, शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यास मदत होईल, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम