सोयाबीनला ६ हजार रुपये प्रती क्विंटल दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | सोलापूर व चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला यंदाचा सर्वोच्च ६ हजार रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळाला आहे. उत्पादनात झालेली घट पाहता भविष्यात दरात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यंदाच्या अतिवृष्टीने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी बाजारात आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात ४ ते ५ हजारावर असलेले सोयाबीनचे दर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ६ हजारावर गेले आहेत. मागीलवर्षी अचानक १० हजारांवर गेलेला दर आवक होताच ५ हजारांवर आला होता. यंदा सोयाबीनची आवक सुरू होताच दरात तेजी दिसत आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment