देशात तुरीला ७ ते ८ हजारांचा भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | २७ ऑक्टोबर २०२२ | सध्या आफ्रिकेच्या काही देशांमधून तूर निर्यात करण्यात अडथळे येत आहेत. मोझांबिकमधून भारताकडे येणारी जहाजे अडकून पडली आहेत. त्यामुळे वेळेवर तूर उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत.देशातील तूर टंचाई दूर करण्यासाठी सरकारने आयात तूर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता .

केंद्र सरकार आफ्रिका आणि म्यानमारमधून आयात होणाऱ्या जवळपास १ लाख टन तुरीची खरेदी करणार आहे. मात्र तूर येण्यास अजून कालावधी लागणार असल्याने सध्या तुरीला ७ हजार ते ८ हजार रुपये दर मिळतोय. हा दर पुढील काही महिने टिकून राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा
#agriculchur
Comments (0)
Add Comment