सोयाबीनची आवक मर्यादीतच

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २० डिसेंबर २०२२ I आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन आणि सोयापेंडच्या दरात काहीशी घसरण झाली होती. सोयाबीन एक टक्क्याने तर सोयापेंड दोन टक्क्यानं नरमलं होतं.

देशातील सोयाबीन बाजार मात्र स्थिर होता. देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार २०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. डिसेंबरमध्ये बाजारातील सोयाबीन आवक एरवी जास्त असते.

त्यामुळं दरही कमी झालेले असतात. मात्र यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनची मर्यादीत विक्री केल्यानं दर टिकून राहीले. जानेवारीत दरात काहीशी सुधारणा होण्याची शक्यता असल्याचं, सोयाबीन बाजारातील जाणकारांनी सांगितलं.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment