महागाई रोखण्याकरिता सरकारकडून मोठे पाऊल

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ |अन्नधान्याची महागाई रोखण्यासाठी सरकार गहू , तांदूळ यासारख्या वस्तू खुल्या बाजारात स्वस्त दरात विकू शकते.खाद्यपदार्थांची महागाई कमी करण्यासाठी सरकार मोठे पाऊल उचलू शकते.

याबाबतचे संकेत अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी सोमवारी दिले. सरकारकडे गहू आणि तांदळाचा पुरेसा साठा आहे. मात्र दुसरीकडे खुल्या बाजारात या मालाचे दर वाढले आहेत. विशेषत: सणासुदीच्या काळात पीठ आणि तांदळासाठी लोकांना जास्त पैसे मोजावे लागतात. सप्टेंबरच्या महागाईच्या आकडेवारीत खाद्यपदार्थांच्या महागाईत मोठी भूमिका सांगण्यात आली होती. यातून सुटका करून घेण्यासाठी सरकार अन्नधान्य विकू शकते.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment