पाण्यात विद्राव्य खतांचे वापराबाबत शेतकऱ्यांना आवाहन

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक श्री. मोहन वाघ, व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव श्री.संभाजी ठाकुर, यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हयात 16 वी भरारी पथकांतील गुणवत्ता नियंत्रण अधिकारी यांचेमार्फत कृषि सेवा केंद्राच्या तपासण्या सुरू आहेत. दरम्यान, कृषि केंद्र चालकांनी निकृष्ट दर्जाचे विद्राव्य खतांची विक्री करु नये असा इशारा कृषि विभागाने विक्रेत्यांना दिला आहे. तसेच कृषि निविष्ठा खरेदी करतांना शेतकन्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हयातील शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे.

विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक श्री. मोहन वाघ, व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. अरुण तायडे, यांनी मे. श्री. स्वामी कृषि केंद्र, एरंडोल या खत विक्रीतून मे. क्रिस्टल कॉर्पोरेशन, भरुच, गुजरात या कंपनीचे उत्पादित केलेले पाण्यात विद्राव्य खंत 13::40:13 बंच क्र. CC-06 Sept. 2022 या नमुना तपासणीसाठी घेतला असता, खत तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार मोठ्या फरकाने अप्रमाणित झाला आहे. त्यानुसार विक्रेत्याकडील उर्वरित साठयास खत नियंत्रण आदेश 1985 नुसार बिक्री बंद आदेश देण्यात आले असून जिल्हयातील इतर खत विक्रेत्यांनी वरिल बॅच नंबरचे खतांची विक्री करु नये. तसे आढल्यास खत नियंत्रण आदेश 1985 नुसार विक्री बंद आदेश देण्यात आले असून जिल्हयातील इतर खत विक्रेत्यांनी वरिल बॅच नंबरचे खतांची विक्री करु नये. तसे आढल्यास खत नियंत्रण आदेश 1985 नुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद सर्व कृषि सेवा केंद्रांनी घ्यावी. अशा सूचना विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक श्री मोहन वाघ, यांनी विभागातील सर्व निरीक्षकांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी दिलेल्या पत्रकान्वने केले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम