नाशिक जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराने ६२ गुरे दगावली

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | जिल्ह्यात सुरुवातीला सिन्नर तालुक्यातील पांगरी व दुसंगवाडी या दोन गावांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव आढळून आला होता. त्यानंतर जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील ७९ गावांमध्ये प्रादुर्भाव झाला. त्यामध्ये रविवारअखेर (ता. १३) ६२ जनावरे दगावली आहेत. ज्यामध्ये २१ गाई, १९ बैल व १० वासरांचा समावेश आहे, अशी माहिती नाशिक जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विष्णू गर्जे यांनी दिली.जिल्ह्यात एकूण ८ लाख ९५ हजार ५० जनावरे आहेत. त्यापैकी ८ लाख ९४ हजार ९५९ जनावरांचे म्हणजेच ९९.९९ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर लसीकरण पूर्ण करून हा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे; मात्र असे असताना आतापर्यंत १ हजार २५२ जनावरे बाधित झाली होती. त्यापैकी ९५३ जनावरे बरी झाली आहेत. तर २३७ जनावरे अद्याप आजारी आहेत. यातील १८ जनावरे अतिगंभीर, ५४ जनावरे गंभीर असून १६५ सौम्य लक्षणांनी बाधित आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम