कापसाला सरासरी ९ हजारांपर्यंत भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ नोव्हेंबर २०२२ | जागतिक संस्था कापसाच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता नाही, असं सांगत आहेत. भारतातील कापसाशी संबंधित संस्था उत्पादनाचे आकडे जास्त दाखवत आहेत. परंतु बाजारावर याचा परिणाम झालेला नाही. बहुतेक बाजारांमध्ये कापसाचा कमाल दर आता प्रति क्विंटल ९५०० रुपयांच्या दरम्यान पोचलाय. सरासरी दर ९ हजारांपर्यंत मिळतोय. मात्र तरीही बाजारातील आवक वाढली नसल्याचं व्यापारी सांगत आहेत. अनेक शेतकरी १० हजारांशिवाय कापूस विकणार नाही, असं सांगत आहेत. इक्रा या जागतिक पतमापन संस्थेच्या म्हणण्यानुसार जुलै-सप्टेंबर तिमाहीमध्ये कापूस दरातील तेजीमुळे आणि इतर खर्चात प्रचंड वाढ झाल्यामुळे कापूस उद्योग संकटात सापडलाय. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर प्रतिकूल परिणाम होईल. तर अमेरिकी कृषी खात्याच्या म्हणजे यूएसडीएच्या अनुमानानुसार जागतिक कापूस व्यापार येत्या हंगामात अजून १० लाख गाठींनी आक्रसला जाईल. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, भारत, ग्रीस आणि मेक्सिकोमधून निर्यात आधीच्या अंदाजापेक्षा कमी होईल, असंही यूएसडीएनं म्हटलंय.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम